Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदार, खासदारांची होणार ओळख परेड?

आमदार, खासदारांची होणार ओळख परेड?



नवी दिल्ली : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगात 12 जानेवारीपासून सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीदरम्यान निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सुनावणीसाठी शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार दिल्लीत निवडणूक आयोगासमोर हजर असतील. त्या सर्वांची ओळख परेड घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ओळखपरेड करुन निवडणूक आयोग चिन्हा संदर्भात निर्णय घेईल, असेही सूत्रांनी सांगितले. शिंदे गटाकडून पुढच्या आठवड्यात लवकरच या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात दिल्लीमध्ये धनुष्यबाण कुणाचं ? यावर फैसला होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात 10 जानेवारीला महत्त्वाची सुनावणी होणार आहे. हे प्रकरण कोर्टाकडून लिस्ट करण्यात आलंय. पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे याबाबत सुनावणी होणार आहे. 

शिवसेना कुणाची? व्हीप कोणाचा लागू होणार? विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय? 16 अपात्र आमदार या मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.