Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सैन्यातील जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

सैन्यातील जवानाची गळफास घेऊन आत्महत्या



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील काखे येथे सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सत्यजीत महादेव खुडे असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.

त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना काल दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. सत्यजित खुडे हे गुजरातमध्ये डी. रिगारमेंट या विभागात सेवा बजावत होते. यावर्षी जानेवारीत ते आपल्या काखे गावी सुट्टीवर आले होते.

काल दुपारी सत्यजित हे दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांचा भाऊ सुनील हा सत्यजित यांना उठविण्यासाठी गेला असता त्यांना सत्यजित यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. यानंतर सत्यजित यांना तातडीने उपचारासाठी कोडोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

सत्यजित यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. कोडोली पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.