Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विट्यातील सराईत गुन्हेगार स्थानबध्द

विट्यातील सराईत गुन्हेगार स्थानबध्द



सांगली : खरा पंचनामा

आपली दहशत रहावी म्हणून गेल्या तीन वर्षांपासून घातक शस्त्रांसह फिरणारा, खूनाचा प्रयत्न करण्याबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या विट्यातील एका सराईत गुन्हेगाराला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

नितीन पांडूरंग जाधव (वय ३३, रा. कार्वे, विटा) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्याचे नाव आहे. या कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले होते. विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांपासून सतत गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्‍या नितीन जाधव याला हद्दपारही करण्यात आले होते. परंतु हद्दपारीच्या आदेशाचा भंग करुन तो पुन्हा परत येऊन गुन्हे करत होता. बेकायदेशीर जमाव करुन स्थावर मालमत्तांचे नुकसान करण्याचेही गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. हा गुन्हेगार समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने विटा पोलिस ठाण्याचे निरिक्षक संतोष डोके, उपनिरिक्षक पांडुरंग कन्हेरे यांनी जाधव याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे दिला होता. 

त्या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर डॉ. तेली यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्‍यांकडे दिला. या प्रस्तावाची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी जाधव याला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जाधव याला स्थानबध्द करण्यात आले आहे. 

ही कारवाई डॉ. तेली, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरिक्षक सतीश शिंदे, विट्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.