Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मच्छिमारांनी वाचवले पोलिसांचे प्राण!

मच्छिमारांनी वाचवले पोलिसांचे प्राण!



पालघर : खरा पंचनामा

पालघर येथे समुद्रात पेट्रोलिंगसाठी गेलेली पोलीसांची बोट अचानक बुडू लागली. स्थानिक मच्छीमारांच्या बोटीच्या मदतीने गस्त घालणारी बोट किनाऱ्यावर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी ही घटना घडली.

पालघर समुद्रात केळवे ते दातीवरे या भागात गस्त घालण्यासाठी गेलेली अशोका बोट दातीवरे गावाच्या समोर समुद्रात 7 नॉटिकल भागात गेल्यावर बोटीत हळूहळू पाणी शिरत असल्याचे तैनात पोलिसांच्या लक्षात आले. 

स्पीड बोटमध्ये अर्ध्यावर पाणी शिरू लागल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाणी पिण्याच्या बाटल्या कापून त्याद्वारे बोटीत शिरलेले पाणी काढण्यास सुरुवात केली. मात्र समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने तुफानी लाटा उसळत होत्या अशा वेळी बोट लाटावर हेलकावे घेत असल्याने बोटीतील पाणी बाहेर काढणे शक्य होत नव्हते. दरम्यान पाणी बोटीत शिरल्याने त्यांच्या लाईफ जॅकेटसह अन्य साहित्य वाहून गेले होते.

बोटीतील एका अधिकाऱ्याने केळवे सागरी पोलीस ठाण्याशी मोबाईलवर संपर्क साधत मदत मागितली. त्यानंतर तेथील पोलिसांसह मांगेल वाडीतील हर्षल मेहेर, राकेश मेहर, आतिश मेहेर, रितेश मेहेर, चंद्रकांत तांडेल आणि रुपेश बंगारा यांच्यासोबत त्यांची लक्ष्मीप्रसाद बोट समुद्रात रवाना केली.

समुद्रात वादळी वारे आणि मोठ्या लाटा उसळत असताना मच्छीमारांनी तासभर प्रवास करत त्या बोटीचा शोध घेतला. समुद्रात भरती असल्याने ही बोट भरतीच्या प्रवाहाने दातीवरे गावाकडून टेम्भी गावाच्या समोर वाहत आली होती. मदतीसाठी बोट पोहचल्यावर बुडत असलेल्या अशोका बोटीतील पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अशोका बोटीत जमलेले पाणी बाहेर काढण्यात सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.