सहकारी महिलेवर अत्याचार, कळंबा कारागृहातील अधिकाऱ्याला अटक
कोल्हापूर : खरा पंचनामा
कारागृहातील महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कळंबा कारागृहातील एका अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत पीडित महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
योगेश भास्कर पाटील असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पीडित महिला शिपाई कळंबा कारागृहात कार्यरत आहे. संशयित अधिकारी योगेश पाटील याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे दिली. यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.
योगेश पाटील याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून 2021 पासून लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान, दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पीडित महिलेने पाटील याच्यासोबत असलेले संबंध तोडले. त्यानंतर त्याने महिलेला जातिवाचक शिवीगाळ करुन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
त्याच्या त्रासाला वैतागून महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत योगेश पाटील विरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आरोपी योगेश पाटील याला तात्काळ अटक केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.