Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात एफआयआर

किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात एफआयआर



मुंबई : खरा पंचनामा

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईत 'एसआरए' संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध वांद्रे येथील निर्मल नगर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांचे कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात गोमाता जनता एसआरए वरळी येथे कथित फसवणूक, बनावटगिरी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत फसवणूक आणि बनावट कागदपत्रे केल्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर बीएमसीकडून कारवाईही करण्यात आली होती
करण्यात आली होती.

त्याचवेळी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किशोरी पेडणेकर यांचे वरळीतील गोमाता नगर येथील कार्यालय आणि घर सील करण्यात आले. बीएमसीने एसआरए कायद्यांतर्गत त्यांचे घर आणि कार्यालय सील केले होते.

दरम्यान पेडणेकर यांच्या विरोधात तक्रारी झाल्यानंतर त्यांची वक्तव्य बंद झाली आहेत. शिवाय त्या शिंदे गट आणि भाजपविरोधात बोलत नाहीत अशीही चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.