राखी सावंत पोलिसांच्या ताब्यात!
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला ताब्यात घेतलं आहे. काही वेळाने तिला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे.
राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
मुंबईच्या सत्र न्यायालयाने कालच राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यानंतर आज तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्रानं एक ट्वीट शेअर केलं आहे. शर्लिन चोप्राच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.