Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील 'त्या' जागेबाबत पडळकर यांना दणका!

मिरजेतील 'त्या' जागेबाबत पडळकर यांना दणका!





सांगली : खरा पंचनामा

मिरज शहरातील दुकाने आणि हॉटेलचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले होते. या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंजद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांना आणखी एक दणका बसला आहे. मिरज तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्या जागेबाबत निकाल दिला आहे. यात मिळतकदारांचा त्या जागेवर कब्जा न्याय दंडाधिकाऱ्यांनी मान्य केला आहे. 

गेल्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या मिरजेतील वादग्रस्त जागेच्या बाबत आज तहसीलदारांनी निकाल दिला आहे. मिरजेतील त्या वादग्रस्त जागेबाबत तहसीलदार दगडू कुंभार यांच्या दालनामध्ये आज हा निकाल देण्यात आला. यामध्ये सदर पडकाम झालेली जागा ही मिळकतदारांच्याच कब्जात असल्याचे कागदपत्रे तपासल्यानंतर समोर आल्यामुळे तहसीलदार दगडू कुंभार यांनी मिळकतदारांच्या बाजूने निकाल दिला आहे.

पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याची मुभाही देण्यात आलेली आहे. त्यामुळे या वादग्रस्त जागे बाबत गेल्या अनेक दिवसापासून सुरू असणारी चर्चा आता थांबली आहे. यामुळे आता पडळकर यांनी बेकायदेशीर जमाव जमवून मिळकतदारांच्या मिळकती पाडण्याचा प्रयत्न केला व कब्जा करण्याचा प्रयत्न केला याबाबत मिळकतदार पुढील लढाई लढणार आहेत. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई ते मागणार आहेत. 

संबंधित जागेवर मिळकतदारांचा कब्जा असून आता पडळकर यांनी योग्य त्या ठिकाणी दाद मागावी असंही निकालात म्हटलं आहे. मिरजेत रस्त्या शेजारी असलेली दोन हॉटेल्स, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर आणि पान शॉप पाडण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांनी तक्रार दाखल केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.