Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वीजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू, महावितरणच्या अभियंत्यावर गुन्हा

वीजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू, महावितरणच्या अभियंत्यावर गुन्हा



पुणे : खरा पंचनामा

उच्च दाब वीज वाहिनीबाबत सुरक्षा न घेतल्याने तिचा धक्का लागून एका १४ वर्षाच्या मुलाच्या मृत्यु झाल्याप्रकरणी महावितरणच्या कात्रज विभागाचे अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शिवलिंग शरणप्पा बोरे असे गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील बलकवडे नगर येथील ओमकार सोसायटी येथे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. 

याबाबत मंजुनाथ पुजारी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश पुजारी (वय १४) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. 

कात्रज कोंढवा रोडवरील ओमकार सोसायटीतील गार्डनमध्ये महावितरणची उच्च दाब वाहिनी जमिनीपासून ४ फुटावर लोंबकळत होती. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्यानंतरही त्याची महावितरणकडून दखल घेण्यात आली नाही. मंजुनाथ पुजारी हे कामानिमित्त कात्रजला आले होते. त्यांचा मुलगाही बरोबर आला होता.
ऋषिकेश हा नववी मध्ये शिकत होता. शाळेला सुट्टी असल्याने तो वडिलांबरोबर आला होता.

ऋषिकेश खेळत असताना चेंडू गार्डनमध्ये गेल्याने तो आणण्यासाठी तिकडे गेला. त्यावेळी त्याला या वीज वाहिनीचा धक्का बसून तो ६० टक्के भाजला होता़. ७ दिवसांच्या उपचारानंतर त्याचा ३० ऑक्टोबर रोजी मृत्यु झाला होता. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. वीजेच्या वाहिनीचा धक्का लागून त्यात ऋषिकेश पुजारी याचा मृत्युस कारणीभूत झाल्याप्रकरणी अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.