Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्या' अपक्ष उमेदवाराने घेतली फडणवीसांची भेट

'त्या' अपक्ष उमेदवाराने घेतली फडणवीसांची भेट



नाशिक : खरा पंचनामा

नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे राजकीयदृष्ट्या ही निवडणूक चुरशीची बनली आहे. आता आणखी एका अपक्ष उमेदवाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या रिंगणातील अपक्ष उमेदवार धनराज विसपुते यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजपने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती विसपुते यांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. धनराज विसपुते यांना भाजपकडून यापूर्वीच उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र भाजपने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने धनराज विसपुते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

त्यामुळे भाजप विसपुतेंना पाठिंबा देणार की नाही, यावरून सस्पेन्स वाढला आहे. तर दुसरीकडे, नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी नाशिकमध्ये नेमका कोणाला पाठिंबा देणार याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये शुभांगी पाटील विरूद्ध सत्यजित तांबे असा सामना रंगणार आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात शनिवारी मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.