हसन मुश्रीफ यांच्या घर, कार्यालयावर इडीचे छापे
कागल : खरा पंचनामा
माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. मुश्रीफ यांच्या कागल तसेच पुण्यातील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. सकाळी सहापासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. छाप्याची माहिती मिळताच मुश्रीफ यांच्या समर्थकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली आहे. तर बुधवारी कागल बंदची हाकही देण्यात आली आहे.
हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरू केली होती. सातत्याने त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. सोमय्या यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट दिली होती.
दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे. कारखान्यामधील झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हे छापे टाकल्याचे बोलले जात आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावरून आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आपला काही संबंध नाही असं म्हटलं होतं.
माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याची माहिती समोर आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.