Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी आरोग्यमंत्री अपघातात गंभीर जखमी!

माजी आरोग्यमंत्री अपघातात गंभीर जखमी!



मुंबई  : खरा पंचनामा

महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या अपघाताचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. आता माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. दीपक सावंत यांच्या कारला डंपरनं धडक दिली आहे. या अपघातामध्ये दीपक सावंत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. सावंत यांना तातडीनं उपचारासाठी अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दीपक सावंत शुक्रवारी सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते, याचवेळी काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. या अपघातामध्ये सावंत जखमी झाले आहेत. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीनं उपचारासाठी अंधेरीमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

या अपघातामध्ये त्यांच्या कारच देखील मोठं नुकसान झालं आहे. राज्यात नेत्यांच्या अपघाताच सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता. रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने उडवलं होतं. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारचा देखील अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या छातीला मार लागला, आणि आता माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.