Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तर थेट बुलडोझर खाली घालू : नितीन गडकरी

तर थेट बुलडोझर खाली घालू : नितीन गडकरी



सांगली : खरा पंचनामा

रस्त्यांच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर खाली घालू, असा दम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. नितीन गडकरी आज सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा येथे रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ठेकेदारांना हा दम दिला आहे.

सांगली शहराला पुणे बंगळुरू महामार्गाला जोडणारा पेठ-सांगली रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या रस्त्यावर असणारे खड्डे आणि रस्त्याचे झालेलं अर्धवट काम यामुळे वाहनधारक नागरिकांच्या मधून सरकार विरोधात नेहमीच रोष व्यक्त करण्यात येत आहे.

हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी खासदार, आमदार यांनी पाठपुरावा केला होता. अखेर केंद्रीय राष्ट्रीय रस्ते विभागाच्या माध्यमातून सांगली पेठ रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. 

या रस्त्याच्या कामाला एक महिन्यात सुरुवात होईल त्यानंतर पुढील 25 वर्ष या रस्त्यात एकही खड्डा पडणार नाही, अशा पद्धतीचे काम केलं जाईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. मी रस्त्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची टक्केवारी घेत नाही. या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नये. अन्यथा ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू अशा शब्दात नितीन गडकरींनी दम भरला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.