Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

...अन त्या तरुणीचा जीव वाचला!

...अन त्या तरुणीचा जीव वाचला!



सांगली : खरा पंचनामा 

सांगलीतील कृष्णा नदीच्या काठावरील स्वामी समर्थ घाटापासून काही अंतरावर असणाऱ्या सांगलीवाडीकडील कदमवाडी बाजूकडे असलेल्या बायपास रस्त्यावरील पुलावरून एका अल्पवयीन तरुणीने कृष्णा नदीमध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी दुपारी ही घटना घडली. त्या तरुणीचे प्राण वाचवण्यात यश आले. 

हा प्रकार कृष्णा बोट क्लबच्या खेळाडूंना निदर्शनास येताच त्यांनी कोणताही विलंब न लावता बोटीतून धाव घेत त्या तरुणीला वाचविले. ती तरुणी बेशुद्ध पडल्याने तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्या तरुणीची कोणतीही माहिती अद्याप समजू शकली नाही. 

कनोईंग व कयाकिंग स्पर्धा सांगली येथे होत आहेत. त्या स्पर्धेचे आज उदघाटन झाल्यानंतर कृष्णा नदीपात्रात रेस्क्यू करण्यासाठी कृष्णा बोट क्लबचे सदस्य होडी घेऊन कार्यरत होते. याचवेळी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास एका १७ वर्षीय तरुणीने बायपास रोडवर असणाऱ्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी ती तरुणी पाण्यामध्ये बुडत असतानाच महेश पवार, रोहित निकम, संजय निकम, पूजा फडोळ यांनी पहिले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता होडीने नवीन पुलाजवळ धाव घेतली. 

ती तरुणी पाण्यात बुडत असतानाच तिला बाहेर काढण्यात आले. यानंतर स्वामी समर्थ घाटावरून ऍम्ब्युलन्सच्या साहाय्याने बेशुद्ध अवस्थेत शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.