Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काँग्रेसचा 'हात' सोडून कवाडे यांची शिंदे गटाला 'साथ'

काँग्रेसचा 'हात' सोडून कवाडे यांची शिंदे गटाला 'साथ'मुंबई : खरा पंचनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिक पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे. कवाडे यांनी काँग्रेसचा 'हात' सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला 'साथ' द्यायचा निर्णय घेतला आहे.

तस पत्रकच जोगेंद्र कवाडे यांनी काढलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीत पीआरपीचाही समावेश झाला आहे. या महायुतीचा राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होतो आणि या महायुतीला दलित समाजाचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी एक पत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आमची युती होत आहे.

शिव, शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा वैचारिक आधार आहे. महाराष्ट्राला विकासगामी करण्यासाठी व राज्यातील सर्व समाज समूहांच्या हक्कासाठी शिंदे आणि त्यांचा पक्ष कटिबद्ध आहे. थोर महामानवांच्या विचारावर आमची आघाडी वाटचाल करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या युतीच्या माध्यमातून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणार असल्याचं सांगतानाच आम्ही शिंदे यांच्याकडे 41 जागा मागितल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.