Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सावरकर, गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजी राजे व्यसनाधीन

सावरकर, गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजी राजे व्यसनाधीन ठाणे : खरा पंचनामा 

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांना घेरणाऱ्या भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संभाजी राजांच्या नाजूक इतिहासात जाऊ नका नाहीतर मोठा वाद निर्माण होईल, असा इशारा देतानाच सावरकर आणि गोळवलकर यांच्या दृष्टीने संभाजी महाराज स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असा दावाच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून हा खळबळजनक दावा केला आहे. तसेच एका मराठी आणि इंग्रजी पुस्तकांची दोन पानेही आव्हाड यांनी ट्विट केली आहेत. सावरकरांनी व माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या बद्दल काय लिहून ठेवले ते वाचा. या शूरवीरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले आहे. 

सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते. कोणी बोलेल ह्याच्या वर? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटमधून केला आहे. शंभूराजे स्वराज्य रक्षक आणि धर्मरक्षकही होते. जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी रयतेसाठी निर्माण केले, त्याचे रक्षण करण्याचे काम शंभू राजेंनी केले. 

त्यांना धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म सगळ्यांना सामावून घेणारा मराठा धर्म अभिप्रेत होता. त्यामुळे स्वराज्य आणि धर्म बाजूला कसे काढता येतील ? असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.