Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस खात्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी काम करा : फडणवीस

पोलिस खात्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी काम करा : फडणवीसपुणे : खरा पंचनामा

यापूर्वी काही लोकांनी महाराष्ट्र पोलिसांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण पोलिस खात्याचे नावलौकिक पुन्हा मिळालं पाहिजे यासाठी पोलिसांनी काम केलं पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना केल्या. 

पुण्यात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची क्राईम कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळ्या विषयांवर प्रेझेंटेशन केले होते. यात वेगवेगळ्या घटकांमध्ये युनिटमध्ये गुन्ह्यांची परिस्थिती काय आहे. प्लॅनिंग काय आहे, याबाबत परामर्ष घेण्यात येतो. 2022 वर्षात वेगवेगळ्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला आहे. यात कुठेकुठे वाढ आहे, कुठे कमतरता आहे यावर लक्ष दिलं. जिथे वाढ आहे त्यामागील कारण काय आहे. याबाबत चर्चा करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले की, ज्याप्रमाणे मधल्या काळात काही लोकांनी महाराष्ट्र पोलिसांच्या नावाला बट्टा लावला आहे. तो संपवावा लागेल आणि पोलीस खात्याला नावलौकिक पुन्हा मिळालं पाहिजे, यासाठी पोलिसांनी काम केलं पाहिजे. तसेच ड्रगच्या विरोधात एक विशेष मोहीम राबिविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.