Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लग्न करून पळून जाणाऱ्या तरुणींच्या सूत्रधार महिलेस अटक

लग्न करून पळून जाणाऱ्या तरुणींच्या सूत्रधार महिलेस अटक



सांगली : खरा पंचनामा

इस्लामपूर शहरातील तरुणाचा विवाह करून देताना त्याच्याकडून २ लाख रुपये उकळून बोगस नववधूला घेऊन जाऊन फसवणूक करणाऱ्या टोळीतील सूत्रधार असलेल्या पुण्यातील महिलेस इस्लामपूर पोलिसांनी वाघोली येथून अटक केली आहे. 

याप्रकरणी रविंद्र उत्तम जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ज्योती धनंजय लोंढे (वय ३८ वर्षे रा. वाघोली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सूत्रधार एजंट महिलेचे नाव आहे. न्यायालयाने तिला ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

लग्न जमविण्यासाठी आलेले संशयीत एजंट सचिन जगन्नाथ रास्कर (रा. कोळी मळा, इस्लामपूर), अर्चना भरत शिंदे (रा. वाघोली, पुणे), सोनाली रावश्या काळे, अर्चना मास्तर सावंत (दोघे रा. पुणे) आणि बेबीजान बाबु शेख (रा. वाळवा) अशा सहा जणांविरूध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

इस्लामपूर येथील एका तरुणाचा विवाह जमत नव्हता म्हणून त्याने इस्लामपूर शहरातील सचिन रास्कर याच्याशी संपर्क साधल्यावर रास्कर याने पुणे येथील ज्योती लोंढे या महिलेशी संपर्क करून अर्चना या महीलेशी पुणे वाघोली येथे विवाह करून देण्याचे ठरविले. त्याबदल्यात दोन लाख रुपये घेवून विवाह करून दिला. त्यांनंतर नववधू अर्चना ही वराच्या घरी ३ दिवस संसार केल्यावर माहेरी जातो असे म्हणून निघून गेली. त्यांनतर ती बरेच दिवस परत आली नाही, म्हणून तिचा शोध घेतला असता अर्चना ही लग्न ठरवताना दिलेल्या पत्यावर रहात नसल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर लग्न जुळवणारी महीला ज्योती लोंढे हिच्याकडे चौकशी केली असता तिने मला अर्चनाबाबत काही माहीती नाही असे सांगत कानावर हात ठेवले. शेवटी लग्नाबाबत आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्याने पोलीसात फिर्याद दिली. अशाच प्रकारे या टोळीने बिरणवाडी ता. तासगांव येथील ३१ वर्षीय तरुणाचेसुद्धा लग्न लावून लग्नासाठी १ लाख ६० हजार रुपये घेवून अर्चना हिच्याशी लग्न लावून दिले. तीनेसुद्धा वराच्या घरी १३ दिवस संसार केल्यावर माहेरी जातो असे सांगून पोबारा केला. ती पुन्हा परत आलीच नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.