शहा-शिंदे-फडणवीस यांच्या बैठकीत पंकजा मुंडे?
मुंबई : खरा पंचनामा
कालपासून राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीला पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते. मुंडे यांचे पुनर्वसन होणार का अशी चर्चा असल्याने या बैठकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांची बैठक होणार आहे. राज्यातील विकास कामांबाबतही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्नही मार्गी लागण्याची चिन्ह आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येऊन गेले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीला पोहोचले आहे. त्यामुळे भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोललं जात आहे. दुपारी चार ते पाच केंद्रीय गृह मंत्रालयात बैठक होणार आहे. नॉर्थ ब्लॉकमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, कॅबिनेट मंत्री राधाकष्ण विखे पाटील, माजी रावसाहेब दानवे,कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धनंजय महाडिक उपस्थित असणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.