सांगलीतुन अपहृताची मुंबई पोलिसांनी केली सुटका



मुंबई : खरा पंचनामा

अपहरण केल्यावर खंडणीची मागणी करून एक महिना पर्यंत ओलीस ठेवलेल्या एकाची कर्नाटक राज्यातील गुलबर्गा व बेळगाव जिल्हा व महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातून सुटका करण्यात मुंबईतील नाम जोशी मार्ग पोलिसांना यश आलं आहे.

फिर्यादी महिला सुनीता काळे आणि त्यांचे पती फुलविक्रीचा व्यवसाय करतात. दोन व्यक्तींनी खोटे कारण सांगून सुनीता हिचे पती रमेश काळे याचे अपहरण केले. अपहरण करून पांडोझरी (ता. जत, सांगली) येथे नेऊन त्याला डांबण्यात आले. तसेच डांबून ठेवल्यानंतर फिर्यादीकडून 7 लाखांची खंडणी मागण्यात आली. 

तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की, हे प्रकरण उसतोडीचे पैसे घेतल्याच्या वादावरून घडले आहे. यामध्ये आरोपी मयुरी चव्हाण आणि संतोष काळे यांनी इतर  संशयितांना मदत करून खंडणी मागण्यासाठी चिथावणी देण्यात आली होती. तसेच काळे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले. 

तांत्रिक विश्लेषणाच्या व गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीतून सदर कारवाई करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.