Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य सरकार सध्या व्हेंटिलेटरवर!

राज्य सरकार सध्या व्हेंटिलेटरवर! नाशिक : खरा पंचनामा 

राजकीय वातावरण एका परिवर्तनाच्या दिशेने चालले असून 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. पण त्याच्या आधीच परिवर्तन होणार असून महाराष्ट्रातील सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, कारण सरकार सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. 

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेना अद्यापही जागेवर असल्याचा निर्वाळा यावेळी दिला. त्याचबरोबर शिंदे गटात गेलेले पदाधिकारी नारायण राणे, राज्य सरकार, मुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबरोबर असून शिवसेना हा महावृक्ष आहे. या महावृक्षाचे बीज बाळासाहेबांनी पेरले असून सध्या कचरा पाला पाचोळा पडतो आहे, कचरा होतो, तो कचरा काही लोक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उचलून नेत आहेत. त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करत असल्याची टीका राऊत यांनी यावेळी केली. 

ते म्हणाले, अधिवेशन काळामध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नागपुरात होतो. यावेळी सरकारचा गोंधळ जवळून पाहिला. यावरून असे वाटते आहे कि सरकार अस्तित्वातच नाही, रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराचे प्रकरण समोर येत सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे गप्पगार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणे, त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भूखंडाची दोन प्रकरणे, उदय सामंत यांचे प्रकरण काढले अशी अनेक प्रकरण अधिवेशन काळात येऊन सुद्धा सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं होते. 

संविधान कायद्यानुसार 16 आमदार अपात्र ठरतील. संविधान, घटना आणि कायदा देशात आहे. त्याचा व्यवस्थित वापर झाला तर हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असे सूचक विधान राऊत यांनी यावेळी केले.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.