संतापजनक : महिलेच्या मृतदेहावर सामूहिक अत्याचार
नागपूर : खरा पंचनामा
नागपूर जिल्ह्यातील खापा तालुक्यात महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. अत्याचार करून महिलेची हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतरही नराधमांनी मृतदेहावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणातील तिन्ही नराधमांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील पीडित महिला शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. यावेळी पीडित महिला शेतात एकटी असल्याचे पाहून नराधम तिच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र या महिलेने विरोध करताच आरोपींनी तिला जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या महिलेची धारधार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. यानंतर नराधमांनी हि महिला मृत झालेली असतानादेखील तिच्या मृतदेहावर सामूहिक अत्याचार केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
