Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी 



पुणे : खरा पंचनामा 

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच प्रवाशांना सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब ठेवल्याचं कळाल्यानंतर प्रवाशांची चांगली धावपळ उडाली. आपला जीव वाचवण्यासाठी प्रवासी इकडेतिकडे सैरावैरा पळू लागले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी सुरु केली तसेच रेल्वे स्टेशन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. याशिवाय काही संशयास्पद वस्तू सापडतात का? यासाठी श्वानपथकाच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. 

दरम्यान, हा धमकीचा फोन नाशिक येथील मनमाड मधून आल्याचे समजत आहे. याप्रकरणी संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक मनमाडला रवाना झाले आहे. मात्र 26 जानेवारी तोंडावर असतानाच अशा प्रकारचा धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.