Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवार भाजपसोबतच : आंबेडकर

शरद पवार भाजपसोबतच : आंबेडकर



मुंबई : खरा पंचनामा

नुकतीच राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली. परंतु अद्यापही राष्ट्रवादी  आणि काँग्रेस पक्षाने वंचित आघाडीबरोबर जाण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार आजही भाजपबरोबर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळी शपथविधी झाला. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यामध्ये अजित पवार यांनी सांगितले होते की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. 2019 च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं, असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

2019 नंतर शरद पवार यांनी भाजप विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, के. सी. आर. यांनी देखील हा प्रयोग केला होता. त्यामध्ये शरद पवार नव्हते. शिवसेनेला भाजपला सोडून बाहेर पडायचं होतं. सेनेने काही तरी करुन सत्ता आपल्या हातात ठेवली असती, तर सरकार पडलं नसतं. पण सत्तेची गरज काँग्रेस-राष्ट्रवादीला होती. शिवसेनेला नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.