Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पिंपरी चिंचवड परिसरात ईडीचे छापे

पिंपरी चिंचवड परिसरात ईडीचे छापे



पिंपरी चिंचवड : खरा पंचनामा

पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने छापा टाकला आहे. बनावट कागदपत्रे वापरून, कर्जवाटपचा चारशे कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. 

याच प्रकरणी मुलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी मुलचंदानी हे जामीनावर बाहेर आले होते. आता पुन्हा ईडीने छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मुलचंदानी यांच्या घरात ईडीचे पथक ठाण मांडून आहे. पिंपरीतल्या मिस्ट्री पॅलेस या इमारतीत मुलचंदानी राहतात. याच ठिकाणी ईडी कसून तपासणी करत आहे. इमारतीखाली पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेचे जवान तैनात आहेत. कोणालाही या इमारतीत प्रवेश करू दिला जात नाही.

सेवा विकास बँकेत अनेक महिन्यांपासून घोटाळा होत असल्याचे बोलले जात होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तपासात १२४ कर्जाची अशी प्रकरणे समोर आले होते, ज्यामध्ये बनावट कागदपत्रे घेऊन जवळपास चारशे कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप करण्यात आले होते. या प्रकरणात मुलचंदानी यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांना अटक झाली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.