Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढणार!

महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढणार!मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. यात सरकारने राज्यातील नगरपालिकांतील स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची संख्या 10 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

लहान महानगरपालिकांमध्ये सदस्य संख्येच्या 10 टक्के स्विकृत नगरसेवक होऊ शकतात, असा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, आता राज्यातील महापालिकेत 5 नाही तर 10 स्विकृत नगरसेवक असणार, त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या मोठ्या महापालिकेत किमान 10 स्विकृत सदस्य असतील.

राज्य वेतन सुधारणा समितीचा (बक्षी समिती) अहवाल खंड-2 स्विकारण्यात आला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. महानगरपालिकांमध्ये स्विकृत नगरसेवक यांच्या संख्येत सुधारणा करण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राइझेसबरोबर व्यावसायिक करारास मान्यता देण्यात आली. गुरे ढोरे रस्त्यावर ने-आण करण्यासंदर्भात आता कैदे ऐवजी दंडाची तरतूद करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.