सांगलीत आर्या हॉटेलमध्ये तोडफोड : 15 जणांवर गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील विश्रामबाग येथील हसनी आश्रम परिसरात असणाऱ्या आर्या हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आली. यावेळी हल्लेखोरांनी अडीच लाखांचे नुकसान केले. यावेळी गल्ल्यातील 22 हजारांची रोकड लंपास करण्यात आली. तर खंडणीसाठी हॉटेल चालकाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली. याप्रकरणी 15 जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. गणेश पाटील, सोहेल शेख, नदीम शेख, अरुण चव्हाण, विनायक दुधाळ, रिक्षावाला यश दुधाळ, बापशा चव्हाण, सुरेश बंडगर यांच्यासह अनोळखी 7 अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गुरुवारी दुपारी यातील काही संशयित आर्या हॉटेल येथे दारू पिण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा तेथील वेटर आणि व्यवस्थापक यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद वाढतच गेला. त्यानंतर संशयितांनी त्यांच्या आणखी काही साथीदारांना तेथे बोलावून घेतले. नंतर सर्व संशयितांनी हॉटेलमधील ग्लास, बाटल्या, खुर्च्या, टेबल तसेच अन्य वस्तूंची तोडफोड केली.
यावेळी संशयितांनी गल्ल्यातील 22 हजारांची रोकडही लंपास केली. तसेच हॉटेल चालकाला मारहाण करत त्याच्याकडे खंडणीचीही मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.