Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

20 हजारांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यांसह दोघांना अटक

20 हजारांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यांसह दोघांना अटक



नागपूर : खरा पंचनामा

रेशन दुकानाकरिता शासनातर्फे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत कायदेशीर कमिशन मिळवून दिल्याच्या मोबदल्यात 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन 20 हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना वर्धा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वर एका खासगी व्यक्तीला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. वर्धा येथील शासकीय विश्रामगृह येथे ही कारवाई करण्यात आली. यानंतर एसबीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी वेगवेगळ्या पाकिटात तब्बल 5 लाख 60 हजार 360 रुपयांची रोकड मिळाली.
 
उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय कृष्णराव सहारे (वय 50, रा. ह/मु रेस्ट हाऊस, जि वर्धा मूळ रा. आंबेडकर वार्ड, रामटेक, जि नागपुर), खाजगी व्यक्ती ऋषिकेष रमेशराव ढोडरे (वय 43 रा. केशवसिटी, जि. वर्धा) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत देवळी तालुक्यातील एका रेशन दुकानदाराने नागपूर एसीबीकडे तक्रार केली आहे.
 
तक्रारदार यांची दोन रेशनची दुकाने आहेत. तक्रारदार यांना दुकानाकरिता शासनातर्फे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत कायदेशीर कमिशन मिळते. ते कमिशन विजय सहारे यांनी काढल्याने त्याचे 25 हजार रुपये. तसेच तक्रारदार यांच्या दुसऱ्या रेशन दुकानाचे 7 महीन्यांचा हफ्ता 25 हजार रूपये असे एकुण 50 हजार रुपये लाचेची मागणी विजय सहारे यांनी केली. तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नागपूर एसीबीकडे तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची बुधवारी पडताळणी केली असता विजय सहारे यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 40 हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. पथकाने शासकीय विश्रामगृह येथे सापळा रचला. ऋषिकेश ढोडरे यांच्या मार्फत 20 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पथकाने विश्रामगृहाची तपासणी केली असता वेगवेगळ्या पाकीटात 5 लाख 60 हजार 360 रुपये मिळाले. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.