Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भरधाव कारने 5 महिलांना चिरडले

भरधाव कारने 5 महिलांना चिरडलेराजगुरुनगर : खरा पंचनामा

पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली (ता. खेड) जवळ खरपुडी फाट्यावर सोमवारी रात्री पाऊणे अकरा वाजण्याचा सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्याकडे निघालेल्या भरधाव अज्ञात कारने १७ महिलांच्या ग्रुपला जोरदार धडक दिली. यात चार ते पाच महिला वाहनाच्या धडकेत अक्षरशः चिरडल्या. त्यातील दोन जागीच ठार झाल्या. तीन रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत झाल्या.

सुनंदा गजेशी, सुशिला देढे (रा. रामटेकडी शांतीनगर), इंदुबाई कांबळे (रा. किरकटवाडी सिंहगडरोड पुणे ), सायराबाई वाघमारे (रामटेकडी हडपसर पुणे) अशी मृतांची नावे आहेत. शोभा गायकवाड, सारीका देवकर, वैषाली धोत्रे, शोभा शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अपघातातील मृत व जखमी अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात वाढपी काम करण्यासाठी स्वारगेट येथून बसने शिरोली येथे उतरल्या होत्या. खरपुडी येथील कृष्णपिंगाक्ष मंगल कार्यालयात मंगळवारी असलेल्या लग्न कार्यक्रमात स्वयंपाक करून वाढपी काम करण्यासाठी जात असताना घोळक्याने रस्ता क्रॉस करताना एक कार भरधाव वेगात आली.

वाहनाने या सर्वांना जोराची धडक दिली. रात्री अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडाओरडा झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेबाबत शिवानी माने (रा. सातारा रोड, स्वारगेट) यांनी अज्ञात चालकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.