Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गांजा तस्करांना 7 दिवस पोलिस कोठडी

गांजा तस्करांना 7 दिवस पोलिस कोठडी 



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे वीस लाखांचा १०२ किलो गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांच्या टोळीस बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

अदिल शहापुरे, सचिन चव्हाण, मयूर कोळी आणि मतीन पठाण अशी त्यांची नावे आहेत. कवठेपिरान ते सर्वोदय कारखाना या रस्त्यावरील बाबासो चव्हाण यांच्या शेतामध्ये काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी सापळा लावला होता. 

त्यामधील चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही वाहने आणि चौघांची झडती घेतली असता वाहनांमध्ये विक्रीसाठी आणलेला २० लाख ४० हजारांचा १०२ किलो वाळलेला गांजा आढळला. चौघांवरही ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.