Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बलात्काराच्या गुन्ह्यामुळे 'सीए'ची आत्महत्या!

बलात्काराच्या गुन्ह्यामुळे 'सीए'ची आत्महत्या!मुंबई : खरा पंचनामा

मुलुंडमधील प्रसिद्ध सीए चिराग विनोदराय वरैया (वय ४५) यांनी इगतपुरी येथील हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांची चौकशी झाली. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. 

नेमक्या कुणाच्या दबावाखाली त्यांनी टोकाचे पाऊल उचलले ? याबाबत तपास सुरू आहे. इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पानी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. सुसाईट नोटमध्ये 'बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत सत्य लवकरच समोर येईल,' असे म्हटले आहे.

मुलुंडमध्ये चिराग यांची 'चिराग वरैया आणि कंपनी' आहे. १० जानेवारी रोजी त्यांच्या विरोधात भांडुप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यात २६ जानेवारी रोजी ते भांडुप पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. शनिवारी ते चालकासोबत त्यांनी इगतपुरी येथील मित्राच्या मानस प्रोजेक्ट हॉटेल विवांतमध्ये थांबले.

अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत इगतपुरीला राहणार असल्याचे कुटुंबीयांना सांगून त्यांनी चालकासोबत इगतपुरी गाठली. पोलिसांना लोकेशन समजू नये म्हणून त्यांचा मोबाइलही घरीच ठेवला होता. शनिवारी दुपारी ३ वाजता हॉटेलवर पोचताच त्यांनी चालकाला दोन हजार रुपये देत पुढील काही दिवस डिस्टर्ब करू नको, असे सांगितले. या ठिकाणाबाबतही कुणाला माहिती देऊ नको. तसेच, सोमवारी मुंबईकडे निघायचे असल्याचे नमूद केले. त्यामुळे चालकाने या दिवसांत त्यांना कॉलही केला नाही. सोमवारी निघायचे असल्याने चालकाने चिराग यांना कॉल करण्यास सुरुवात केली. दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद आला नाही. अखेर, इगतपुरी पोलिसांशी संपर्क साधताच त्यांनी
खिडकी तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.