बँक अधिकाऱ्यांचा छळ करणाऱ्यांवर कारवाई करा
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेत अधिकाऱ्यांना 30 तास कोंडून अमानुष छळ करणाऱ्या 'ईडी'च्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनने केली आहे. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 'जिल्हा बँकेच्या चौकशीचे कारण सांगून 30 तास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी झाली. शिवीगाळही करण्यात आली. अमानुषपणे डांबून ठेवले. ईडीने टाकलेला हा छापा राजकीय होता. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा या राजकारणात बळी दिला जात आहे. चौकशी झाल्यानंतर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन मुंबईला चौकशीसाठी नेले.
निवदेनात म्हटले आहे की, "30 तासांच्या चौकशीमुळे अधिकारी थकले होते. चौकशी करताना त्यांना शिवीगाळ करण्यात आली. मोबाईल काढून घेऊन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलू दिले नाही. अधिकाऱ्यांना भेटायला आलेल्या त्यांच्या मुलांची अडवणूक केली. सक्तवसुली संचालनालयाच्या 22 अधिकाऱ्यांनी बँकेतील 30 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा अमानुष छळ केला. तीस तासांच्या चौकशीनंतर आरोग्य बिघडल्याने या अधिकाऱ्याला हदयविकाराचा झटका आला. याला जबाबदार धरून ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे".
ईडीकडून तब्बल 70 तासांनी सुटका झाल्यानंतर कोल्हापुरात परतलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांचे मुख्यालयाच्या प्रांगणात पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.