Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबे अज्ञात स्थळी

नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबे अज्ञात स्थळी



नाशिक : खरा पंचनामा

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील आपल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, या निवडणुकीत प्रमुख दावेदार सत्यजित तांबे अज्ञात स्थळी रवाना झाल्यामुळे नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

अगदी मतमोजणीच्या दिवशी तांबे पिता-पुत्रांच्या हालचालीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. तांबे कुटुंबियांकडे तसेच कार्यकर्त्यांकडे सत्यजित तांबे यांची चौकशी केली असता ते अज्ञात स्थळी गेल्याचे सांगण्यात आले. मतमोजणीच्या अगदी ऐनवेळी सत्यजित तांबे समोर येतील अशी माहितीही देण्यात आलीय. 

तुमची नेमकी भूमिका काय, असा सवाल डॉ. सुधीर तांबे यांना केला असता त्यांनी योग्य वेळ भूमिका स्पष्ट करू, प्रतिक्रिया दिली. दरम्यान तांबे यांचा या निवडणुकीत विजय झाल्यास ते महाविकास आघाडीकडे जाणार की भाजपकडे याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.