Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीला परवानगी नाकारली; शिवप्रेमींचा संताप

आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीला परवानगी नाकारली; शिवप्रेमींचा संताप



नवी दिल्ली : खरा पंचनामा

आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे 11 नोव्हेंबर 2022 पासून या परवानगीसाठी प्रयत्न केले जात होते. वेळोवेळी पाठपुरावा करुनही शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकरण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. एवढच नाही तर अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती. ज्यांचा ऐतिहासीक संबध त्या किल्ल्याशी नाही अशांना परवानगी दिली जाते. मग त्या किल्ल्याशी ऐतिहासीक संबध असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली असा संतप्त सवाल अंजिक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केला आहे.

शिवजयंतीला परवानगी नाकारताना पुरातत्व विभागानं कोणतंही कारण दिलेलं नाही. मुळात किल्ल्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देण्याबाबत कुठलीही नियमावली नाही. त्यामुळेच पुरातत्व विभाग पक्षपातीपणा आणि मनमानीपणा करत असल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला आहे. आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी करायला परवानगी द्यावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय सांस्कृतीक मंत्री जी. किशन रेड्डी यांना शिफारस पत्रही दिलं होतं. एवढचं नाही तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांची तीनवेळा भेटही घेतली. तरीही परवानगी नाकारली. 

आग्र्यामध्येच छत्रपती शिवरायांना औरंगजेबाकडून कैद आणि त्यातून महाराजांची ऐतिहासिक सुटका या पराक्रमी घटनेला उजळणी देण्यासाठी शिवप्रेमींचा आग्र्यात शिवजयंती साजरा करण्याचा मनोदय होता. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाकडून चालढकल होत असल्याने अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.