Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अरुण गवळीच्या भावासह दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत!

अरुण गवळीच्या भावासह दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत!



मुंबई : खरा पंचनामा

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोडदौड जबरदस्त वेगात सुरुच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी अतिशय महत्त्वाची घडामोड घडलीय. मुंबईच्या भायखळ्यातील प्रसिद्ध असलेल्या दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे यामध्ये दगडी चाळीतील अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या भावाचादेखील समावेश आहे.

दगळी चाळीतील डॉन अरुण गवळी यांचा भाऊ प्रदिप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शनिवारी रात्री उशिरा दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

"सहा-सात महिन्यात बाळासाहेबांच्या विचारांचे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. खरं म्हणजे मी सगळ्यांचे स्वागत करतो. हे सरकार सर्व सामान्य लोकांचे सरकार आहे. या राज्याला पुढे घेऊन जाणारे सरकार आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास करणारे सरकार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.