Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अत्याचारातून जन्मलेल्या मुलाच्या पोषणासाठीचे चेक बाऊन्स : माजी मंत्र्यांवर गुन्हा

अत्याचारातून जन्मलेल्या मुलाच्या पोषणासाठीचे चेक बाऊन्स : माजी मंत्र्यांवर गुन्हा



पुणे : खरा पंचनामा

अत्याचारातून जन्मलेल्या मुलाचा सांभाळ करतो, अस सांगून लग्नाचे आमिष दाखवून तिला चाकूचा धाक दाखवून एका महिलेवर अत्याचार केला. त्यातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक बाऊन्स झाले. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे याप्रकरणी भाजप-सेनेच्या युती सरकारमध्ये सामाजिक न्याय तथा क्रीडा मंत्री असलेल्या उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्तम खंदारे (वय ६५, रा. सोलापूर), त्याचे साथीदार महादेव भोसले, बंडु दशरथ गवळी (रा. सोलापूर) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बी रेस्ट हाऊस व बिबवेवाडीत २०१२ पासून ते आतापर्यंतच्या काळात घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम खंदारे याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले व फिर्यादीच्या मुलाचा सांभाळ करतो, असे भासवले. बी रेस्ट हाऊस येथे फिर्यादीला बोलावले. त्यांना चाकूचा धाक दाखवून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी नकार दिला असता त्या तावडीतून निघून जाऊ नये, म्हणून त्याने फिर्यादीस पूर्ण विवस्त्र केले. पट्ट्याने मारहाण करुन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारात फिर्यादी गर्भवती राहिल्या.

त्यांना मुलगा झाला. या मुलाच्या संगोपनासाठी खंदारे याने आर्थिक तरतुद म्हणून चेक दिले. परंतु ते चेक वटले नाही. तेव्हा त्यांनी ही बाब त्यांना सांगितल्यावर त्याने व इतरांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी आता जीवाच्या भितीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.