मुंबईत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू!
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईत शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंना दिल्यानंतर ही कार्यकारिणीची बैठक होत आहे.
या बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत, तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीला सर्व अधिकार देण्यात येणार आहेत. बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची निवड मुख्य नेता म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही सादर करण्यात येणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या संसदीय दलांच्या नेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे. गजानन किर्तीकर यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली जाणार आहे, तर लोकसभा ग्रुप लीडर म्हणून राहुल शेवाळे असतील, असे सांगण्यात आले.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संपूर्ण अधिकार देण्यात येणार आहेत. 1998 साली बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार कार्यकारिणी स्थापन होणार आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणून कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे आता एकनाथ शिंदे पक्षप्रमुख होतात का मुख्य नेते राहतात? का एकनाथ शिंदेंसाठी वेगळं पद तयार केलं जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.