एक्साईजच्या सांगलीच्या एसपी संध्याराणी देशमुख आता खादी, ग्रामोद्योग आयोगाच्या संचालक
सांगली : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) सांगलीच्या अधीक्षक श्रीमती संध्याराणी देशमुख यांना त्यांच्या पदावरून गुरुवारी कायर्मुक्त करण्यात आले. त्यांची नियुक्ती आता मुंबईतील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या संचालकपदी करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती प्रतिनियुक्तीवर करण्यात आल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. लवकरच त्या पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले.
देशमुख या मूळच्या सांगली जिल्ह्यातीलच आहेत. २०२१ मध्ये त्यांची नियुक्ती राज्य उत्पादन शुल्कच्या सांगलीच्या अधीक्षक म्हणून करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात गोवा बनावटीची दारू, हातभट्टी अड्डे उध्वस्त करण्यात आले. मिरज तालुक्यातील शेतातून जप्त करण्यात आलेला एक कोटी रूपयांचा गांजा ही त्यांची सर्वात उठावदार कारवाई ठरली.
श्रीमती देशमुख यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे विभाग बदलून मिळण्यासाठी राज्य शासनाकडे अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांना एक्साईजच्या अधीक्षक पदावरून कायर्मुक्त करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.