Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस यांची जुगलबंदी!

जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस यांची जुगलबंदी!



लातूर : खरा पंचनामा

माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. दोघांनीही एकमेकांना जोरदार चिमटे काढले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधी विचारांवरून जयंत पाटील यांच्यावर टीका केली. त्याआधी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्या कार्यक्रमात परिधान केलेल्या शिवाजीराव पाटील यांच्या टोपी आणि जॅकेटबद्दल भाष्य केले होते. याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, दिवंगत शिवाजीराव हे काँग्रेसच्या विचारांचे होते. त्यांनी कायमच सभागृहात काँग्रेसची पाठराखण केली. निलंगा मतदारसंघाने त्यांना 10 वेळा निवडणून देण्याचा विक्रम केला. पण मला आनंद होत आहे की, संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शिवाजीराव पाटील यांचे टोपी आणि जॅकेट घातले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, शिवाजीरावांची ही गांधी विचारांची टोपी आहे. या टोपीने भारताला गांधी विचारांनी कसे विकासाच्या दिशेने न्यायचे हे सांगितले. तो गांधी विचार आज पुन्हा एकदा संभाजी पाटील निलंगेकर यांच्या डोक्यावर चढला हे पाहून आनंद झाल्याचे वक्तव्य यावेळी त्यांनी व्यक्त केले. 

तर देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्ही चिंता करू नका, तुमच्या मंत्री पदाच्या आड ही टोपी येणार नाही, असा टोला त्यांनी संभाजी निलंगेकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना लगावला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जयंत पाटील यांना प्रत्यत्तर दिले. गांधी विचारानेचं हा देश समृद्ध होईल. मात्र, तुम्ही गांधीजींना टोपीपुरते मर्यादित ठेवले आहे. त्यामुळे ही गांधी टोपी संभाजी पाटील यांना घालून तो विचार कसा पुढे नेता येईल, यासाठी हा प्रयत्न करावा लागला. म्हणूनच त्यांना शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे जॅकेट आणि टोपी घातलेली आहे. त्यामुळे काही हरकत नाही. ही केवळ विचाराची टोपी आणि विचाराचे जॅकेट नाही तर विकासाची टोपी आणि विकासाचे जॅकेट आहे, असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.