Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीमा पोलिस बलातील जवान 'पळपुटा' जाहीर!

सीमा पोलिस बलातील जवान 'पळपुटा' जाहीर!



कोल्हापूर : खरा पंचनामा

भारत-तिबेट सीमा पोलिस बलाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिपायाला शुक्रवारी पळपुटा जाहीर केले. विजय गोविंद मांगले (रा. नरेवाडी, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. १५ दिवसांत 'लेह' येथे कर्तव्यावर हजर न राहिल्यास सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा त्याला देण्यात आला आहे.

वरिष्ठांची अनुमती न घेता सतत गैरहजर राहिल्याने त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. मांगले १९ सप्टेंबर २०२२ पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुमती न घेता सतत गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे वेळोवेळी त्यांना तीन नोटिसा बजावण्यात आल्या. त्यालाही प्रतिसाद न दिल्याने अटक वॉरंटही काढण्यात आला होता. 

दरम्यान, महिन्यापेक्षा अधिक काळ परवानगीशिवाय गैरहजर राहिल्यामुळे न्यायिक तपास समितीकडून त्याच्या गैरहजेरीची कारणमीमांसा करण्यात आली. त्यानंतर समितीच्या निकषांनुसार त्याला पळपुटा घोषित करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.