Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोकुळनगरमधून दोन राजस्थानी मुलींची सुटका : दोन महिलांसह तिघांवर गुन्हा

गोकुळनगरमधून दोन राजस्थानी मुलींची सुटका : दोन महिलांसह तिघांवर गुन्हा



सांगली : खरा पंचनामा

शहरातील गोकुळनगरमधील एका कुंटणखान्यावर विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून दोन राजस्थानी युवतींची सुटका केली. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

कविता भिराव कट्टीमणी (वय २७, रा. मुद्देबाळ, विजापूर, सद्या रा. गोकुळनगर), जनताबाई गिरीराज तील्लोर (६०, गोकुळनगर, मूळ रा. राजस्थान) अशी त्या दोन महिलांची नावे आहेत. वेश्‍या व्यवसायासाठी सरंक्षण दिल्याप्रकरणी नितीन ठोकळे (रा. टिंबर एरिया) याच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला. 

शुक्रवारी दुपारी गोकुळनगरमधील गल्ली क्रमांक दोनमध्ये पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी संशयित जनताबाई तील्लोर कुंटणखाना चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. त्यावेळी संशयित पीडितांना जबरदस्तीने वेश्‍या व्यवसायासाठी भाग पडत असल्याचे दिसून आले. तेवीस वर्षीय युवती चौथका, वरवाड (राजस्थान) येथील, तर दुसरी २१ वर्षीय युवती भवानीपुरा, बनगामाता बुंदी (राजस्थान) येथील युवती सापडल्या. पोलिसांनी त्यांची पोलिसांनी सुटका केली. 

घराची मालकीन संशयित कविता कट्टीमणी आणि व्यवसायासाठी संरक्षण दिल्याप्रकरणी नितीन ठोकळे याच्यावरही यावेळी गुन्हा नोंद करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.