Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अदानी प्रकरणाशी केंद्र सरकारचा सबंध नाही : जोशी

अदानी प्रकरणाशी केंद्र सरकारचा सबंध नाही : जोशी



नवी दिल्ली : खरा पंचनामा

अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये अदानी समुहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांवर आतापर्यंत केंद्रातील मोदी सरकारने कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले होते. परंतु आज केंद्र सरकारने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी संसदेतील विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला घेराव घालत आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे मोदी सरकारने आदानी समूहावरील आरोपांच्या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले आहे.

विशेष म्हणजे, अदानी समूहाबाबत प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय येत आहे. शुक्रवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू न झाल्याने सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

सरकारला या प्रकरणाशी काहीही देणेघेणे 'नसून विरोधक त्यांच्याकडे इतर कोणतेही मुद्दे नसल्याने हा मुद्दा उपस्थित करत असल्याचे जोशी यांनी शुक्रवारी म्हटले. संसदेत पत्रकारांशी बोलताना अदानी समुहाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर जोशी यांनी त्यावर उत्तर देताना या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.