Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कसब्यात नवा ट्विस्ट : काँग्रेसकडून रोहित टिळक यांना उमेदवारी?

कसब्यात नवा ट्विस्ट : काँग्रेसकडून रोहित टिळक यांना उमेदवारी?



पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये नवीन ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. भाजपने कसबा पोटनिवणुकीत टिळक कुटुंबा ऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपवर ब्राम्हण समाज नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता या नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होऊ शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल असे चित्र होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते रोहित टिळक  यांनी काँग्रेसकडून  उमेदवारीसाठी प्रयत्न केले नाही. मात्र, आता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रोहित टिळक यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याची माहीती आहे.

तसेच रोहित टिळक यांना उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसच्या एका गटानेही प्रयत्न सुरु केल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्याची उमेदवारी फायनल असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे रासने आणि धंगेकर यांच्यामध्ये सामना होईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता रोहित टिळक यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांच्या नावावर काँग्रेसमध्ये विचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघापैकी कसबा आणि कोथरुडमध्ये ब्राम्हण समाजाचा मतदार मोठा आहे. मात्र, कोथरुडमध्ये भाजपने मेधा कुलकर्णी यांच्या ऐवजी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर आता टिळक कुटुंबात उमेदवारी देण्या ऐवजी रासने यांना संधी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्राम्हण समाज नाराज असल्याचे सांगितेल जात आहे.

आता त्याचाच फायदा काँग्रेसकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टिळक कुटुंबातील आणि त्यातच ब्राम्हण उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे सांगितेल जात आहे. जर रासने आणि रोहित टिळक अशी लढत झाली तर टिळक कुटुंबातील उमेदवार असल्याने रोहित यांना सहानुभूती मिळेल, अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे. तसेच रोहित टिळक यांनी येथे विधानसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.