Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राहुल गांधी यांना सचिवालयाची नोटीस

राहुल गांधी यांना सचिवालयाची नोटीसनवी दिल्ली : खरा पंचनामा

अदानी प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत हल्लाबोल केला होता. त्यामुळे राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहे. या नोटीसीला 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सचिवालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

भाजप नेते निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी यांच्यावर विशेषाधिकाराचा भंगाचा आरोप करत लोकसभा सचिवालयाकडे तक्रार नोंदवली होती. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे.

खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींच्या भाषणावर विशेषाधिकार भंगाची नोटीस जारी केली होती. तसेच, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित नियम 380 नुसार राहुल गांधींच्या भाषणातील असंसदीय, असन्माननीय आरोप लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली होती.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना राहुल गांधींनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन येतात आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक कंत्राटे अदानींच्या कंपन्यांना मिळतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशातील उद्योगजगत त्यांच्या विरोधात होते. त्या काळात अदानी मोदींच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा त्यांचे परस्पसंबंध स्थानिक पातळीवरचे होते, मग गुजरातव्यापी झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे संबंध राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.