Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली : बापट

निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली : बापटमुंबई : खरा पंचनामा

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर आगामी काळात काय काय गोष्टी बदलणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क बांधण्यात येत आहेत.

असे असतानाच कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी निवडणूक आयोगाच्या या निकालावर महत्त्वाचे विधान केले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर आपला निकाल द्यायला नको होता. निवडणूक आयोगाने मोठी चूक केली आहे, असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.

"निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय म्हणजे राजकीय भूकंप आहे. या निर्णयाचे काय परिणाम होणार, या निर्णयाचा फायदा तसेच तोटा किती झाला, हे काळच ठरवेल. सर्वोच्च न्यायालय कदाचित आगामी चार ते पाच दिवसांत आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या खटल्याचा निकाल देऊ शकते. कारण आता या खटल्याची सलग सुनावणी होणार आहे," असे उल्हास बापट म्हणाले.

“सध्याचे पाच सदस्यीय घटनापीठ आमदारांच्या अपात्रतेचा तसेच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबतचा खटला कोणत्याही क्षणी सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याचाही निर्णय घेऊ शकते. विद्यमान पाच सदस्यीय घटनापीठाने तसा निर्णय घेतला, तर हा खठला वर्षभर चालेल. मात्र सध्याच्याच पाच न्यायमूर्तींनी या खटल्यावर निकाल दिला आणि तो निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात लागला, तर मग गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या अगोदरच हा निर्णय देऊन गंभीर चूक केली आहे," असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.