Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एक्साईजमधील चार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

एक्साईजमधील चार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या 



मुंबई : खरा पंचनामा 

राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 विभागीय उपायुक्त, 2 अधीक्षकांचा समावेश आहे. या बदल्यांचे आदेश उप सचिव युवराज अजेटराव यांच्या सहीने नुकतेच काढण्यात आले आहेत. 

पुण्याचे विभागीय आयुक्त अनिल चासकर यांची नागपूरचे विभागीय उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. नागपूरचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांची पुण्याचे विभागीय उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. 

मुंबई उपनगरच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांची सिंधुदुर्गच्या अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. बीडचे अधीक्षक नितीन घुले यांची मुंबई उपनगरचे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.