Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कॉन्स्टेबलने केला पीएसआयचा खून!

कॉन्स्टेबलने केला पीएसआयचा खून!



कल्याण : खरा पंचनामा

कल्याण येथे चौकशी केल्याच्या रागातून आणि वेतनवाढ रोखल्याच्या रागातून रेल्वे सुरक्षा दलाच्या एका कॉन्स्टेबलने पोलीस उपनिरीक्षकाचा खून केला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलीस कॉनस्टेबलला पेण येथून अटक केली आहे. कल्याण पूर्व भागातील सिद्धार्थ नगर येथील रेल्वे बॅरेकमध्ये ही घटना घडली आहे. बसवराज गर्ग असे खून झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर कॉन्स्टेबल पंकज यादव असे खून करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. 

बसवराज गर्ग हे रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये उपनिरीक्षक पदावर कार्य़रत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात रोहाचा परिसर येतो. तर पंकज यादव याची पोस्टिंग पेण आरपीएफ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रोहा येथे आहे. एका प्रकरणात पंकज यादव याची चौकशी करत कारवाई केल्याचा राग पंकजला होता. त्याने पगारवाढीची शिफारस करण्यासाठी गर्ग यांच्या परवानगीची गरज होती. मात्र, त्यानी त्याची वेतनवाढ रोखली होती.

वेतनवाढ रोखल्याच्या रागातून बुधवारी रात्री पंकज याने गरग यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी होऊन गर्ग यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंकज यादव याला पेण येथून अटक केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.