Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भोंग्यांबद्दल राज ठाकरे आता कधी आंदोलन करणार : तोगडिया

भोंग्यांबद्दल राज ठाकरे आता कधी आंदोलन करणार : तोगडिया



बुलढाणा : खरा पंचनामा

मशिदीवरील भोंग्यावरून हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात अजानच्या मुद्दयावरून राज ठाकरे मैदानात उतरले होते. आता काय झाले? असा सवाल करतानाच मित्रांचे सरकार आलंय. आता कधी आंदोलन करणार हे त्यांना विचारा; असा टोला प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. 

अजाण आणि लाऊडस्पीकरबाबत राज ठाकरेंना विचारा काय झालं ते? आता त्यांच्या मित्रांचं सरकार आलं आहे, त्यांना विचारा की कधी आंदोलन करून अजाण आणि लाऊडस्पीकर बंद करणार आहात? उद्धव ठाकरेंच्या काळात तर ते मैदानात आले होते. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आंदोलन केलं तर मी त्यांच्या सोबत राहील, असं प्रवीण तोगडिया यांनी यावेळी म्हटलं आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्रात औरंगजेबावर प्रेम करणारे छूट भैया अनेक आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या जन्मगावी जावं. मस्लिम लोकसंख्या वाढू नये यासाठी कायदा बनवावा. हिंदूंनी तर लोकसंख्येवर नियंत्रण केले आहे. मुसलमान पाच वेळा नमाज अदा करूनही चुकीचं काम करतात. बाबा रामदेव चुकीचं बोलत नाहीत. लव्ह जिहादच्या कायद्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गरज पडल्यास भेटेल, असेही तोगडिया यांनी सांगितले.

गुजरात आणि हरयाणामध्ये लव्ह जिहाद कायदा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हा कायदा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता. पण उशीर झालाय, असंही ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.