Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फडणवीसांची साद, ठाकरेंचा प्रतिसाद!

फडणवीसांची साद, ठाकरेंचा प्रतिसाद!



मुंबई : खरा पंचनामा

उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यापासून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये संघर्ष सुरु आहे. कालांतराने हा संघर्ष शिगेला पोहोचला आणि याच संघर्षातून शिवसेनेत फूट पडून ठाकरेंचं सरकारही कोसळलं. त्यानंतर दोघांमधील दरी वाढतच गेली. मात्र नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साद दिली आणि आदित्य ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला. यामुळे राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वारंवार आरोप- प्रत्यारोप होत आहेत, पण हे सगळं घडत असलं, तरी आपण शत्रू नसल्याचं सांगत फडणवीस वारंवार ठाकरेंविरोधात संघर्ष केवळ राजकीय असल्याचं सांगत आहेत. आता देवेंद्र फडणवीसांच्या या आवाहनाला ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. आदित्य ठाकरेंना फडणवीसांसंदर्भात विचारणा केली असताना, त्यांनीही देवेंद्र फडणवीसांना मित्र मानत असल्याचं सांगितलं. 

आदित्य ठाकरेंच्या या भूमिकेनंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरेंसोबत केवळ वैचारिक विरोध असल्याचं सांगितलं. राजकारणात वैचारीक विरोध असतो, उद्धव ठाकरे किंवा आदित्य माझे शत्रु नाहीत. वैचारिक विरोधक झालोय, कारण त्यांनी दुसरा विचार पकडलाय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाने आता टोक गाठलं आहे. रोजच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चढत असतानाच राज्याच्या राजकारणात नवे ट्विस्ट येत आहेत. त्यातच आता फडणवीस आणि ठाकरेंकडून आलेली ही वक्तव्य भविष्यातील नव्या धक्कातंत्राची नांदी तर नाही ना? याबाबत मात्र चर्चा सुरू झाल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.