Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सरन्यायाधीशांनी मराठीतील 'ते' पत्र वाचून दाखवले!

सरन्यायाधीशांनी मराठीतील 'ते' पत्र वाचून दाखवले!



नवी दिल्ली : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. १६ आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांचे निर्णय यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद होत आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीतील ठरावाचे एक पत्र आपल्या युक्तिवादासोबत जोडले होते. मात्र हे पत्र मराठीत असल्यामुळे त्याचे भाषांतरही जोडण्यात यावे असे न्यायाधीश कोहली यांनी सांगितले. त्यानंतर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी यामध्ये हस्तक्षेप करत हे मराठीतील पत्र सर्वोच्च न्यायलयात वाचून दाखवत शिवसेना कार्यकारणीच्या ठरावच्या बैठकीत काय निर्णय झाले, याची माहिती दिली.



या पत्रातला ठराव वाचून दाखविताना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, "शिवसेना भवन, दादर, मुंबई येथे शिवसेना पक्षाची नवनिर्वाचित आमदारांची बैठक शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी बैठकीच्या सुरुवातीलच या बैठकीत होणाऱ्या निर्णयांचे सर्व अधिकार अध्यक्ष म्हणून शिवसेनाप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना दिले. याप्रमाणे बैठकीत महाराष्ट्र राज्य विधीमंडळातील शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून आमदार श्री. एकनाथ संभाजी शिंदे व विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणून आमदार श्री. सुनील प्रभू यांची एकमताने निवड करण्यात आली. या दोन्ही निवडींचे दोन ठराव पुढीलप्रमाणे आहेत. "

या पत्रावरुन उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देण्यात आले होते. तसेच गटनेता, प्रतोद म्हणून कुणाला अधिकार दिले आहेत, याबाबत या पत्रात उल्लेख केलेला आहे, अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पत्राचा सार ऐकून दाखविला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.